BIG NEWS : शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल करण्यात आले आहे.
दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरुन चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या राजीनामा परत घ्या, याच्या दबावामुळे पवार यांनी आपला निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनात मोठा धक्का दिला. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.
प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना देखील कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे. तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
