Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा महामेळावा संपन्न

पुणे :  EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समिती( पेन्शन धारक) पुणे जिल्ह्याच्या वतीने आंबेगाव पठार, कात्रज ,पुणे येथे महामेळावा संपन्न झाला. 

या वेळी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रीय अध्यक्ष (नि) कमांडर अशोकराव राऊत साहेब,चिंतामणी ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष विजय (आप्पा) रेणुसे,राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभाताई आरस,प. भारत महिला आघाडी सचिव सरीताताई नारखेडे, पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंह जाधव,मुख्य समन्वयक विलासराव पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भानुदास नारखेडे, छत्तीसगड राजनंदगावचे समन्वयक एजाज उर रहेमान ,महाराष्ट्र सचिव सुधीर चांडगे,पुणे जि.अध्यक्ष सतिश शिंदे, जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे, पिंपरी – चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत,कार्याध्यक्ष विजय (आण्णा) जगताप,समन्वयक पुणे अजित घाडगे, कार्यकारी सदस्य शिवशंकर कलोरे,जगन्नाथ मछले, पुणे चे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते.

या वेळी कमांडर अशोकराव राऊत साहेब यांनी सांगितले की, केंद्र सरकाराने या पावसाळी अधिवेशनात आमच्या पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही देशभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू तसेच खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न मी व माझे सर्व सहकारी या अधिवेशनात पेन्शन वाढ संदर्भातील प्रश्न आक्रमकपणे मांडू व जो पर्यंत पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी पेन्शन धारक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी काळभोर यांनी केले. प्रस्ताविक सी.एम राऊत यांनी केले व आभार विजय राजपाठक यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading