Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज – स्वामी ओमानंद भारती

पुणे : सदृढ आरोग्यासाठी “आरोग्य शिबीर रेकी, योगा, मेडीटेशनचे” शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलन स्वामी ओमानंद भारती (विश्व गुरू रेकी ग्रँड मास्टर) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून झोसुद अध्यक्ष भगवानराव वैराट, महाराष्ट्र लोगशिक्षक संघाची जिल्हाध्यक्ष कांचन भोसले, मारिया मिली, मार्टिन, जोजेत, ओम रेकी फॅमिली फ्रान्सचे मिखा बाबा, कुलदीप तिवारी, अनुराग तिवारी, राहुल तिवारी, शिवम पांडे, राहुल सांडभोर, गौरी पाटील, आरुषी शिंगोटे असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. स्वामी रामानंद भारती यांचा योग परिवार खूप मोठा आहे. त्यांच्या आश्रमाच्या युरोपमध्ये दोन शाखा आहेत. तर पुण्यामध्ये लोहगाव कोरेगाव पार्क आणि पौड या ठिकाणी त्यांचा शाखा आहेत. सदरील शिबिरात ३०० हुन अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता.

स्वामी ओमानंद भारती म्हणाले की वाढलेले पोट अथवा वजन कमी करण्याची चिंता सध्या अनेक नागरिकांना सतावत आहे. अशा स्थितीत वजन किंवा पोट कमी करण्यासाठी योग हा सर्वांत महत्त्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो. महिलांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगाभ्यास फायदेशीर ठरतो. 

वैराट म्हणाले की स्वामींची ही संस्था समाज हितासाठी काम करणारी आहे. समाजातील गोरगरिबांना मदत करणे. वृद्धांना मदत करणे, अनाथ मुलांना मदत करणे आणि कल्याणकारी योजना राबवते. ही संस्था खऱ्या अर्थाने भारतापुरती सीमित राहिली नाही. स्वामीजींनी जगाच्या पाठीवर ही सेवा नेलेली आहे. रेखीद्वारे स्वामींनी अनेकांच्या व्याधींचे निवारण केले आहे. रेखी ही शरीरातली ऊर्जा देऊन त्या माणसांची दुःख वेदना ही घालवण्याची एक संस्कृती आहे.

सदरील शिबिराचे आयोजन ॐ रेकी फॅमिली शाखा : कोरेगाव पार्क, लोहगाव, पौड यांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading