Thursday, September 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मविप्रने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा कायम जपावा – छगन भुजबळ

नाशिक  :- महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारी मविप्र ही संस्था आहे. या संस्थेने बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाड खुली केली. अनेक समाज धुरिनिणी आपलं योगदान दिलं आहे. या संस्थेची धुरा ॲड. नितीन ठाकरे यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असून संस्थेची पुढची वाटचाल ही महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा घेऊन कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या कवी कालिदास कला मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या हस्ते मवीप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण तज्ञ डॉ.मो.स.गोसावी, माजी पालकमंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ नेते हेमंत टकले, आमदार माणिकराव कोकाटे, ॲड.जयंत जायभावे, ॲड.अविनाश भिडे, ॲड.आशिष देशमुख, ॲड.भगवान साळुंखे, ॲड. सतीश देशमुख,ॲड.हेमंत धात्रक, ॲड.विलास लोणारी, डॉ.अभिमन्यू पवार, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ.अविनाश धर्माधिकारी, परवेज कोकणी,ॲड. रवींद्र पगार, प्रा.बाळासाहेब पिंगळे, शैलेश गोसावी, उद्योजक दिपक बागड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ध्येयाने स्थापित झालेली व गेल्या १०८ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील मुख्यत्वे आदिवासी व ग्रामीण भागात शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारी मविप्र संस्था आपल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या विद्याशाखांच्या मार्फत आपले बहुमोल योगदान देत आहे. या संस्थेची ॲड.नितीन ठाकरे सांभाळत आहे. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आहे. नाशिक जिल्हा कोर्टासाठी जमीन व त्याच्या विकासासाठी निधी मिळविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अज्ञानाच्या खोल गर्तेतून बाहेर पडत आदिवासी व बहुजन समाज तेजाच्या शिखराकडे मार्गस्थ व्हावा, या हेतूने महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर, धार संस्थानचे श्रीमंत उदाजी पवार महाराज आदींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता विशद करून कृतिशील पावले टाकली. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत जनतेचे कल्याण आणि आनंदासाठी सामाजिक हेतू जागृत करण्याचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीतून कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतदादा मोरे आदी समाजधुरिणांनी १९१४ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, आदिवासी, बहुजन समाजाला शिक्षित करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. अनेकांच्या समर्पण, त्याग व योगदानातून ही संस्था यशोशिखरावर गेली. रयत शिक्षण संस्थेचे कामकाज खा.शरदचंद्र पवार साहेब बघत आहे. ही संस्था अतिशय मोठी झाली आहे. त्या खालोखाल मराठा विद्या प्रसारक संस्था काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वसा कायम जपावा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मराठा समाजाकडे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारा समाज म्हणून पाहिले जात होते आणि या समाजाने नेहमीच बहुजन समाजाला सोबत घेत आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. त्यामुळे मराठा समाजावरून संस्थेचे नाव असले, तरीसुद्धा अठरापगड जातींना पहिल्या दिवसापासून बरोबर घेण्याचे काम संस्थेच्या संस्थापकांनी केलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम एक वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९१४ साली उदोजी महाराज वसतिगृहाची स्थापना झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, धारच्या उदोजी महाराज पवार यांनी दरवर्षी तीन हजार रुपये संस्थेला दिले. ते १९४८ पर्यंत म्हणजेच संस्थाने खालसा होईपर्यंत सुरू होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी मोठी भरीव स्वरूपाची आर्थिक मदत संस्थेला केली. सुरुवातीच्या काळात वसतिगृहासाठी विद्यार्थी गोळा करण्याकरिता गणपतदादा मोरे यांनी गावोगावी जलसे करून प्रयत्न केले. रावसाहेब थोरातांसह सर्व संस्थापक गावोगावी जाऊन प्रबोधन करायचे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading