Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

नव्या कल्पनांमुळे विज्ञानाला विकसित होण्याची संधी मिळते ; डॉ. विजय भाटकर

‘श्री. स्वामी समर्थ औंध पुरस्कारा’चे वितरण : पुरस्काराचे हे २३ वे वर्ष

पुणे : विज्ञानात कल्पनेला खूप महत्त्व आहे. कल्पनेशिवाय विज्ञानात प्रगती होवू शकत नाही. एखादी गोष्ट आहे किंवा नाही, हे विज्ञानात सिद्ध करावे लागते. विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली की, नव्या कल्पना उदयाला येतात, यातूनच विज्ञानाला विकसीत होण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन डॉ. विजय भटकर यांनी केले.

पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे झालेल्या कार्यक्रमात, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा ‘श्री. स्वामी समर्थ औंध पुरस्कार’ पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकर यांना स्वाध्याय परिवाराच्या श्रीमती धनश्री तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत पाटील, योगेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वाध्याय परिवाराच्या प्रवर्तक धनश्री तळवलकर म्हणाल्या, विज्ञानात एखादी गोष्ट सिद्ध केली, की पुन्हा त्यातीलच पुढच्या शोधला सुरुवात होते. त्यामुळे त्या वैज्ञानिक गोष्टी सातत्याने विकसीत होत असतात. विज्ञानात प्रत्येक गोष्ट ही मोजमापात असते, मात्र, ज्या गोष्टी मोजता येत नाहीत, त्या गोष्टी अध्यात्मात येतात.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रतिष्ठानच्या सोहळ्याविषयी माहिती दिली. दर वर्षी नवीन विषयाची निवड करून या उप्रकमाचे आयोजन करण्यात येते. हे सोहळ्याचे २३ वे वर्ष असून यावेळी आत्मविश्वास या विषयानुसार सर्व सप्ताहातील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड गंधाली भिडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश कुलकर्णी यांनी केले.

 तोपर्यंत मी सुपर कॉम्प्युटर पहिला नव्हता…!!
तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, त्या विभागाचे सचिव, मी आणि आणखी काही लोकांना बैठकीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला सुपर कॉम्प्युटर तयार करता येईल का? असे विचारले. त्यावेळी मी सुपर कॉम्प्युटर पहिला देखील नव्हता. मात्र, आत्मविश्वासाने मी होकार दिला. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या मागे असणाऱ्या इमारतीत आम्ही सुपर कॉम्प्युटर बनविण्यास सुरुवात केली व अथक परिश्रमाने यशस्वी देखील झालो, अशी आठवण असे डॉ. विजय भाटकर यांनी सांगितली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading