fbpx

कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य.संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पुणे : छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य. संस्थापक/ अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून आज गुरूवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून विविध कार्यक्रमामध्ये रुग्णवाहिका लोकार्पण सोबत वृक्षारोपण, पावसाळ्यात गोरगरीब लोकांचे संरक्षण होण्यासाठी छत्रीवाटप, सद्यस्थितीत कोरोनानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रक्तदान शिबिर व वृक्ष वाटप करण्यात आले. सांयकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा देखील संपन्न झाला.

बहुजनांच्या हक्काचे व हिताचे काम करणारी छावा स्वराज्य सेना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) समाजकार्याची नेहमीच आवड जोपासली असताना समाजाचे काहीतरी आपण देणं लागत असतो या भावनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती देखील राम घायतिडक(पाटील) यांनी यावेळी दिली.

यावेळी छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य.पदाधिकारी मित्र मंडळी तसेच मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: