Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘रोमार्टिका आर्ट डिकोडेड’च्या कलाकारांचा सामुहिक कलाविष्कार

पुणे : ‘रोमार्टिका आर्ट डिकोडेड’ या कला प्रवर्तक संस्थेच्या वतीने जुलै २०२२ मधील सामूहिक कला प्रदर्शनातील पहिले प्रदर्शन कोरेगाव पार्क पुणे येथील मलाका स्पाइस कलादालनात भरवण्यात आले आहे. नुकतेच या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे बिजनेस स्कूलच्या प्रमुख डॉक्टर मंजू चोप्रा यांच्या हस्ते झाले. या चित्रप्रदर्शनामध्ये प्रशांत हिर्लेकर, सोनल सक्सेना, शाश्वती देवनाथ आणि क्षिप्रा पित्रे या चार समकालीन कलाकारांनी रेखाटलेली चित्रे ठेवली आहेत.

या चित्र प्रदर्शनात चित्रकार प्रशांत हिर्लेकर यांनी रेखाटलेल्या मर्कटलीला आधुनिक अस्थिर मानसिकतेचे दर्शन घडवतात. तर सोनल सक्सेना यांच्या भारतीय शास्त्रशुद्ध परंपरागत चित्रांमध्ये आनंदी वातावरण व तत्सम भावनांचे प्रकटीकरण आहे. तसेच शाश्वती देबनाथ यांच्या चित्रांमध्ये एकोणिसाव्या शतकातील युरोपमध्ये असणारे वातावरण व तेथील लोकांची जीवनशैली व सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचे ठळक दर्शन घडते. अन् क्षिप्रा पित्रे यांच्या चारकोल मधील व्यक्तिचित्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे डोळे व त्यातून व्यक्त होणाऱ्या नेमक्या भावना मनाला स्पर्शून जातात.

हे प्रदर्शन येत्या १६ जुलै 2022 पर्यंत सर्वांना रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.ह्या प्रदर्शनात प्रत्येक आठवड्याच्या शेवटी संध्याकाळी चित्रकार व चित्रकर्ते प्रत्यक्ष सादरीकरण करणार असून सर्वांना ते बघण्याची एक सुसंधी आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading