Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

‘ड्रीम्स पर स्क्वेअर फीट’ या पुण्याच्या पहिल्या रियल इस्टेट ई – मॅगझीनचे प्रकाशन

पुणे : पुण्यातील रेसिडेन्सी क्लब, येथे ‘ड्रीम्स पर स्क्वेअर फीट’ या रियल इस्टेट विषयक पहिल्या ई-मॅगझीनचे प्रकाशन झाले.

ड्रीमवर्क्स युनिव्हर्सिटी, बेलान्झा कन्सलटँस्ट, पुणेकरन्यूज.इन, आणि डेटा टेक लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र क्रेडाय, बी.एन.आय. इस्ट आणि नॉर्थ, लिडकोन, आणि वेरीप्रॉप, यांच्या सहकार्याने हे मॅगझीन प्रकाशित करण्यात आले आहे.

याप्रसंगी ड्रीम्स पर स्क्वेअर फीट’चे संपादक, उमेश पवार म्हणाले, “या मॅगझीनच्या माध्यमातून आम्ही रियल इस्टेट क्षेत्राशी निगडित टर्निंग पॉईंट्स, नॉलेज शेअरिंग, आणि यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, आणि रियल इस्टेट क्षेत्रातील हिरोजची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. ग्राहकाला योग्य माहिती पुरवणे आणि त्यांचा प्रॉपर्टी विकत घेण्याची निर्णय प्रक्रिया सोपी करणे, हा या मॅगझीनचा हेतू आहे. तसेच, रियल इस्टेट क्षेत्रात पूर्ण वेळ काम करून आपले करियर सुरू करण्यास इच्छूक लोकांनादेखील या मॅगझीनमुळे फायदा होणार आहे.”

ते पुढे म्हणाले, ” ड्रीम्स पर स्क्वेअर फीट मॅगझीन हे अनेकांच्या स्वप्नांचे, यश साध्य करण्याच्या इच्छेचे, आणि मॅगझीनची निर्मिती होण्यासाठी एकत्र आलेल्या समविचारी लोकांच्या एकत्र येण्यामुळे साध्य झाले आहे.”

राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया हे या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी मगर म्हणले,” कोव्हिडने प्रत्येक क्षेत्रावर प्रचंड परिणाम पाडलेला आहे. आधीच्या काळात, पन्नाशीला आलेली माणसे घरे विकत घ्यायची. आता ही परिस्थिती बदलली असून तरुण ग्राहकदेखील आपल्या निवृत्तीची तजवीज म्हणून नव्हे, तर आपले आयुष्य सुखाने घालवण्यासाठी घरे विकत घेत असल्याचे दिसून येत आहे.”

पुढे ते म्हणाले, “ड्रीम्स पर स्क्वेअर फीट हा एक उत्तम प्रयोग आहे. रियल इस्टेट क्षेत्राची परिस्थिती योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, या मॅगझीनचे स्वरूप ऑनलाइन असल्यामुळे ते अधिकाधिक वाचकांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे.”

कटारिया या प्रसंगी म्हणाले, ” बांधकाम क्षेत्रात, खासकरून पुण्यात, अनेक संधी उपलब्ध आहेत. आपण उत्तरोत्तर वाटचाल करत असतानाच, बांधकाम क्षेत्राचे ज्ञान आपल्याला असणे, ही काळाची खरी गरज आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading