Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

शिरूर शहरात आप पक्ष बांधणी करणार : मुकुंद किर्दत

पुणे : भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा जन्म शिरूर तालुक्यातील आहे, आणि म्हणूनच याच आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीची नाळ शिरूरशी आहे. परंतु खुद्द शिरूरमध्ये सध्या आर्थिक ताकद व घराणेशाही मधून आलेली सत्ता आणि स्थानिक संस्थावरील कब्जा याच्या सहाय्याने सत्ता राबवली जात आहे. निवडून गेलेल्या प्रतिनिधीना शिरूर मध्ये संपर्क कार्यालय सुद्धा सुरु करावे वाटत नाही. बैलगाडी शर्यती पलीकडे जनतेचे काही प्रश्न आहेत याचे भान या नेत्यांना नाही. या सर्वाला नवा राजकीय पर्याय म्हणून आम आदमी पार्टी शिरूर मध्ये संघटना बांधणी करणार आहे, असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

शिरूर तालुका आम आदमी पार्टी ची बैठक काल खारा मळा, शिरूर येथील संपन्न झाली. यावेळी पक्षाचे तुषार कासार, शिरूर अध्यक्ष अनिल डांगे तसेच नितीन पवार , सुभाष छाजेड , शरद दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळेस अनेक  युवक व रिक्षा चालकांनी पक्ष प्रवेश केला.

दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील यशामुळे जनतेत आप विषयी उत्सुकता आहे. जनतेला आप चे शिक्षण , आरोग्य क्षेत्रातील काम व वीजबिल माफी सारख्या सुविधांचे आकर्षण आहे. अनिल डांगे यांनी या पुढच्या काळात सदस्य नोंदणी मोहीम व स्थानिक प्रश्नावर आंदोलने करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading