विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइनच; मे ऐवजी 1 जून पासून सुरू होणार परिक्षा
मुंबई : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कोरोना काळात घेतले गेलेले अनेक निर्णय
शिक्षण संस्थांनी बदलले आहेत. कोरोना काळात जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाइन घेण्याकडे सरकारचा कल होता. मात्र आता शाळा, महाविद्यालये सुरु झालीत त्यामुळे परीक्षा सुद्धा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यंदाच्या वर्षी मे ऐवजी 1 जून ते 15 जुलै दरम्यान या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. या शिवाय दोन पेपरमध्ये दोन दिवसांचे अंतर देखील ठेवले जाणार आहे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
सोमवारी, 25 एप्रिल 2022 रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली. आज यासंदर्भात उदय सामंतांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठाचे कुलगुरू ठाम आहेत असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय.
कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत.परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे,दोन पेपर मध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता 1जून ते 15जुलै पर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.
— Uday Samant (@samant_uday) April 26, 2022