‘विनोद लेखनाने जीवन सुसह्य व्हावे’ :शानभाग

पुणे : ‘भोवतालची अस्वस्थता,तणाव आणि गोंगाट वाढला असताना जीवन असह्य होत आहे,अशावेळी विनोद लेखनाने जीवन सुसह्य व्हावे,नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेचा गारवा आणावा’,अशी अपेक्षा ‘शची इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक मर्थु शानभाग यांनी व्यक्त केली.

सुनील देव लिखित ‘आणि..मी लेखक झालो’पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल जॅग्स इन च्या सभागृहात मर्थु शानभाग यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.निवृत्त अभियंता असलेल्या सुनील देव यांचे हे सातवे पुस्तक असून अस्तित्व प्रकाशन(विलासपूर) यांनी ते प्रकाशित केले आहे.

शानभाग म्हणाले,’दूरचित्रवाणी वाहिन्यांवर विनोदी कार्यक्रम वाढले असले तरी सर्वच भाषांमध्ये विनोदी लेखन करण्याचे प्रमाण कमी होवू लागले आहे. मनाला विरंगुळा देणारे हास्य ही मानवाची मानसिक गरज आहे.विनोदी लेखनाने ही गरज पुरवली पाहिजे आणि मनाचे आरोग्य जपले पाहिजे.सुनील देव यांच्या विनोदी कथांनी वाचकांना मनमुराद आनंद देण्याचे काम केले आहे.
सुनील देव ह्यांनी पुस्तकाची माहिती देवून विनोदी कथांची खुसखुशीत जन्मकथा सांगितली.’विनोद घडला की हसणे सोपे असते,विनोदी लेखन वाचताना हसणे स्वाभाविक असते,मात्र,विनोदी लेखन करणे सहजसाध्य नसते,असेही त्यांनी सांगितले.

चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या विनोदी कथा अमॅझॉन वर :

‘आणि… मी लेखक झालो’ या पुस्तकात ७ विनोदी कथा आहेत व १ दीर्घकथा ह्यांचा समावेश आहे. विनोदी कथा वाचताना वाचक स्वत:च्या आयुष्यातील घटनांशी संबंध लावू शकतील व त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुटेल.दीर्घकथा एका चित्रकाराची प्रेमकथा असून त्यातील हळुवारपणा व उत्कृष्ट वर्णन ह्यामुळे वाचकांना नक्कीच आवडेल. हे पुस्तक अमेझॉन,फ्लिपकार्ट,किंडल,गुडरीड्स वर विक्रीस उपलब्ध आहे. सुनील देव( संपर्क-9822206170) यांच्याकडेही हे पुस्तक मिळू शकेल.

Leave a Reply

%d bloggers like this: