चारित्र्य गमविल्यास जीवनातील प्रत्येक गोष्ट हरवेल – आचार्य किशोरजी व्यास 

पुणे : यशाची प्रेरणा ही वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवून करण्यात यावी आणि परमेश्वराचे सतत मनन करावे. आपल्याकडील संपत्ती गेली म्हणजे काहीही हरवले नाही, तर आपण आरोग्य गमावल्यास काहीतरी हरवले आहे, असे समजावे. चारित्र्य आणि आत्मविश्वास गमविला, तर जीवनातील प्रत्येक गोष्ट हरवेल. त्याकरीता श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या युद्धभूमीवरील संवाद एकून प्रत्येकाने आपले मनोबल वाढवावे, असे मत श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.

महेश प्रोफेशनल फोरम पुणे वेस्ट च्या सन २०२२-२०२३ कार्यकारणी पदाधिका-यांचा पदग्रहण समारोह पाषाण येथील सेंट्रल रिसर्च पोलिस आॅडिटोरियम येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. फोरमच्या नवनियुक्त अध्यक्षपदी किशोर भन्साळी, सचिवपदी धीरज बंग, कोषाध्यक्षपदी भावेश पनपालिया यांची निवड करण्यात आली.

तसेच नीता धूत, निलेश लखोटिया, स्वप्ना धूत, अमित परतानी, कैलाश सीखची, गोविंद चांडक, मीनाक्षी जागेटिया, कुश राठी, पंखोरी गट्टानी, मनीष सोमानी, सचिन भूतडा, अनूप काबरा, स्मिता गट्टानी यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. कार्यक्रमाला महेश प्रोफेशनल फोरम पुणे वेस्ट चे सर्व आजी-माजी पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. नीता धूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: