Saturday, November 7, 2026
Latest NewsPUNE

विकास पोळ, सुयोग अडसूळ, भावना शिळीमकर ठरले भिमथॉनचे विजेते.

पुणे : डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणार्‍या मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित  भिमथॉन स्पर्धेतील पुरुष गटात पहिला येण्याचा मान विकास पोळ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक सुनील कांबळे व तृतिय क्रमांक आदित्य गाडवे यांना मिळाला. १८ वर्षाखालील गटात सुयोग अडसूळ, संदीप यादव आणि आदित्य पायाळ विजयी ठरले. महिला खुल्या गटात साधना झोरे ,पल्लवी सोनवणे व दिपाली मारणे विजयी ठरल्या. १८ वर्षाखालील युवती गटात भावना शिळीमकर काव्या देशमुख आणि दीप्ती कदम यांनी विजयाचा मान पटकावला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमथॉन स्पर्धेचे आयोजन स्पार्क फौंडेशन चे किशोर कंबळे, माय अर्थ चे अनंत घरत यांनी केले. ७ किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप झाला. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला व मॅरेथॉन ची शोभा वाढवली. विजेत्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले व सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल देण्यात आले.

या मॅरेथॉनला अभय छाजेड सरचिटणीस काँग्रेस कमिटी, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, सचिन अडेकर सदस्य पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, वकील अंबादास बनसोडे, आकाश साबळे, शेकाप चे सागर आल्हाट, श्रीकांत सुखदेवें, सागर ढावरे, विजय जोरी, आकाश नागटीळे, रवी भोसले, संजय साळवी, राजेश शेलार, नंदू येवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

Leave a Reply