Sunday, June 21, 2026
Latest NewsSports

व्ही.के.सोनावणे स्मृती चषक हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अकादमी संघाला विजेतेपद 

पुणे : दिवंगत क्रिडा शिक्षक कै.श्री.वैजीनाथ सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सोनाली सोनावणे-मुंढे आणि त्यांच्या टीम यांच्या वतीने आयोजित व्ही.के.सोनावणे स्मृती चषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत एक्सलन्सी अकादमी संघाने रोवर्स अकादमी संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 

शिवछञपती क्रिडा प्रबोधनी,म्हाळूंगे बालेवाडी येथील हॉकीच्या मैदानावर पार पडलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत स्टिफन स्वामी, रूबेन कडली, फिलिक्स बा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्सलन्सी अकादमी संघाने रोवर्स अकादमी संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 
 
दिवगंत क्रिडा शिक्षक कै.श्री.व्ही.के.सोनावणे त्यांची कन्या सोनाली सोनावणे-मुंढे आणि त्यांच्या टीम यांनी या हॉकीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. दिवगंत क्रिडा शिक्षक कै.श्री.व्ही.के.सोनावणे सर यांनी आयुष्यभर आपल्या मार्गदर्शनातून खेळाच्या विविध प्रकारात प्राविण्य मिळविलेली खेळाडू घडवले.त्यांच्या या प्रेरणादायी कार्यातून आजच्या खेळाडुंना प्रेरणा व उर्जा मिळावी हा या स्पर्धा भरविण्यामागचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. सोनाली सोनावणे-मुंढे या  महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत, ज्यांनी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात यश मिळवले आहे.  
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुनिल जायभाय(फाऊंडर-अडसिन सोलार सिस्टम), डॉ.राम मुंडे व लाकरा(प्रशिक्षक, क्रिडा प्रबोधनी) व भाग्यश्री निंबाळकर, विजया मोगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू-पोलीस वैशाली सुल-सोन्नावर, राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत गुळवे, तलाठी अधिकारी सतीश देवकडे, हर्षल कुलकर्णी, धनुर्धर ठाकूर टॅक्स कन्सलटंट, सर्व आजी-माजी विद्यार्थी व पालक तसेच क्रिडा प्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार मनोगत व्यक्त करताना ॲड.नागेश जायभाय यांनी कै.व्ही.के.सोनावणे सर यांचा प्रेरणादायी प्रवास अगदी आत्मियतेने मांडला. ज्ञानेश्वर सोनावणे आणि दिपाली सोनावणे-घुगे यांचे या स्पर्धेला प्रायोजकत्व लाभले होते.
निकाल: अंतिम फेरी:
एक्सलन्सी अकादमी: 3(स्टीफन स्वामी 7मि., रूबेन कडली 24मि.,फिलिक्स बा 29मि.)वि.वि.रोवर्स अकादमी: 0.  
 
इतर पारितोषिके: 
सर्वोत्कृष्ट खेळाडू: फिलिक्स बा;
सर्वोत्तम फॉरवर्ड: धैर्यशील जाधव;
सर्वोत्कृष्ट बचावपटू: गणेश पाटील;
सर्वोत्तम गोल रक्षक: ऋषिकेश जाधव;
सर्वोत्कृष्ट शिस्तीचा संघ: क्रीडा प्रबोधिनी.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading