Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

उंड्रीतील युरो शाळेत पालकांना धक्काबुक्की

पुणे : बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता उंड्री येथील युरो शाळेत देखील असाच प्रकार घडला आहे. आज (दि. 4) सकाळी हा प्रकार घडला. आजपासून CBSE बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा विषयी चौकशी करण्यासाठी गेले असता

नेकमा प्रकरण काय आहे ? 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खाजगी शाळांनी शालेय शूल्कात वाढ केली आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या तक्रारी केल्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेल द्वारे टीसी पाठवले होते. दरम्यान आज BSE बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे चौकशी करण्यासाठी आज संबंधीत पालक शाळेत गेले होते. तेव्हा प्रवेशावेळी पालक शाळेत गेल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाली. पालकांना बराच वेळ गेटबाहेर थांबवून ठेवण्यात आले होते. यावेळी शाळेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालकांनी संताप व्यक्त. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोंढवा पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी क्लाइन मेमोरियल शाळेत पालकांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर हा मुद्दा अधिवेशनातही गाजला होता. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता शिक्षणमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading