चार समकालीन चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचा सामुहिक कलाविष्कार

पुणे : चार समकालीन चित्रकारांनी काढलेली चित्रे एकाच छताखाली पाहण्याची अनोखी संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात मलाईका स्पाईस ह्या कलादालनात १ ते ८ एप्रिल २०२२ यादरम्यान हा सामूहिक कलाविष्कार भरवण्यात आला आहे. यामध्ये वास्तुविशारद प्रकाश आंबेगावकर, आरती शर्मा, प्रा. रणजित साठे व पल्लवी किरण ह्या ४ समकालीन चित्रकारांनी काढलेली चित्रे पाहता येणार आहेत. ८ एप्रिल 2022 पर्यंत सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येईल. या प्रदर्शनाचे आयोजन रोमार्टीका आर्ट डेकोडेड हयांनी केले आहे.

ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन कलेतिहास तज्ञ दिपक कन्नल व चित्रकार शरद तरडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात वास्तुविशारद असलेले सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश आंबेगावकर ह्यांनी आपल्या अमेरिकेतील वास्तव्यानंतर भारतात परतल्यावर पाहिल्यांचाद स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन येथे भरवले आहे. त्यांची वैशिट्यपूर्ण संकल्पना, कलात्मकता, योग्य अशी रंगसंगती व अनोखी विचारांवर आधारित तंत्रशुद्ध शैली ह्यामुळे ही सर्व चित्रे रसिकांशी सुसंवाद साधतात. तर अंतर्गत रचना व सजावट ह्यात निपुण अशा आरती शर्मा ह्यांची अमूर्त शैलीतील ही चित्रे सर्वांना एका आगळ्यावेगळ्या भाव विश्वात नेऊन एक अनोखी अनुभूती देतात. चित्रकलेचा प्राध्यापक व संरचनात्मक कार्य करणारा अशी पार्श्वभूमी लाभलेल्या रणजित राम साठे ह्यांची चित्रे आई व तिचे मूल यात असणारे वात्सल्य, माया व प्रेम ह्यांचे एक नितांत सुंदर दर्शन सगळ्यांना घडवितात. तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पल्लवी किरण ह्यांची आशयघन व कलात्मक चित्रे मानवी आत्म्याची विविध रूपे आणि त्यातील रंजक अशी अनुभूती सर्वांना देतात.

Leave a Reply

%d bloggers like this: