आम्हाला भाजपची ‘सी टीम’ कोण आहे ते पहायला मिळाले – सचिन अहिर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदावरूनही टीका केली. यावेळी महानगरपालिका निवडणुकीत मनसेची बाजी की युती होऊ शकते असेही राज ठाकरे म्हणाले. यावर विरोधी पक्षातील नेते हे प्रतिक्रिया देत आहेत. त्यावर शिवसेनेचे नेते व संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. उशीरा मनसेला जाग आल्याची दिसते. त्यामुळे आम्हाला भाजपची सी टीम कोण आहे ते पहायला मिळाले, असे वक्तव्य सचिन अहिर पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. 

मुंबई महापालिकेत शिवसेनेनं कस काम केले आहे. हे जनतेला माहित आहे. त्यांचेही सदस्य महापालिकेत निवडून आले होते. पण त्यांना ते सोडून गेले ते का सोडून गेले आहेत हे त्यांनी पहायला पाहिजे. त्यांच्या आता पाया खालची वाळू सरकली आहे. म्हणून ते अशी टीका करत असल्याचे सचिन अहिर म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली यावर बोलताना अहिर म्हणाले, हे काय टायमिंग आहे. काल भेट ही राजकीय भेट होती. आमचा भाजपला पाठिंबा आहे अस मनसेने जाहीर करावे, ‘लावरे तो व्हिडिओ’ हे बोलत होतो हे चुकीचे होते, असेही अहिर म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: