माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरूंगात दुखापत; जे जे रुग्णालयात केले दाखल
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला तुरूंगात दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवारी अनिल देशमुख हे बाथरूममध्ये पाया घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत त्यांचा खांदा दुखावला गेला आहे. शिवाय त्यांना गेल्या अनेक वर्षांमपासून खांदा दुखीचा त्रास आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या अनेक तपासण्या सुरू आहेत. तसेच MR केल्या नंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही? याबाबत निर्माय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य आधीष्टता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
