हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकवाला; कात्रज येथील धक्कादायक प्रकार
पुणे : कात्रज परिसरात एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह लोखंडी पाईपला लटकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश किसन जाधव असं (वय 42 वर्षे) खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कात्रज येथील सुंधामातानगर परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लक्ष्मी माता मंदिराजवळ 1 एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास हा मृतदेह सापडला. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला असता व्यक्तीचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. प्रकाश किसन जाधव हे मजूर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि इतर नातेवाईक असा परिवार आहे.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
