विद्यार्थ्यांसह स्कूलबस पाच तास गायब; सांताक्रूझ येथील धक्कादायक प्रकार    

मुंबई : आज जवळपास दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने सकाळी विद्यार्थी मित्रांच्या ओढीने शाळेत गेले. मात्र दुपारी 12 वा. शाळा सुटूनही विद्यार्थ्यांना यायाला उशीर झाल्याने पालक शाळेत पोचले अन् एकच आक्रोश सुरू झाला. विद्यार्थ्यांसह स्कूलबस गायब असल्याने पालकांच्या काळजाचे ठोके वाढायला लागले.  हा धक्कादायक प्रकार आहे सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेतील. अखेर पाच तासांनंतर संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबई पोलिसांनी स्कूल बस सापडली असून विद्यार्थी घरी पोचल्याचे सांगितले. तेव्हा पालकांचा जीव भांड्यात पडला.

नेमकं काय घडलं ? 

आज अनेक CBSE च्या शाळा सुरू झाल्या आहेत. सांताक्रूझमधील पोद्दार शाळा ही आज भरली. मात्र दुपारी 12 वा. शाळा सुटल्यावर मुळे दोन तांसानंतरी घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे पालकांनी शाळेत धाव घेतली. मात्र शाळा प्रशासनाला ही याबाबत काही माहिती नव्हती शिवाय ड्रायव्हरचा फोन ही स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर पाच तासानंतर स्कूल बस सापडली व मुळे सुखरूप आपल्या घरी पोहचली. मात्र या दरम्यानच्या काळात पालकांची झालेली अवस्था शब्दांत मांडता न येणारी आहे.

चालकाला रस्ता माहीत नसल्याने घडला प्रकार 

“शाळेचा आजचा पहिला दिवस होता. शिवाय या स्कूल बस वरील चालकाही नवीन आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील रास्ते समजले नसल्याने हा प्रकार घडला. यामध्ये कोणताही घातपाताचा प्रकार नाही. संबंधीत चालकावर शाळा योग्य कारवाई करेल.”

– विश्वास नांगरे पाटील (सह पोलिस आयुक्त, मुंबई)  

 

Leave a Reply

%d bloggers like this: