Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

राज्य सरकारने सण – उत्सव यावरील सर्व निर्बंध शिथिल केले त्याबद्दल धन्यवाद- प्रशांत जगताप

पुणे:आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने उद्या दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून महाराष्ट्र राज्यात covid-19 मुळे लागू असलेले सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. गेल्या दोन वर्षांमध्ये सरकारलादेखील हे निर्बंध लागू करण्याची इच्छा नव्हती, परंतु कोविड सारख्या संसर्गजन्य आजारामुळे सरकारला ही बंधने टाकावी लागली, महाराष्ट्रातील नागरिकांनी देखील धैर्याने या परिस्थितीला तोंड देत राज्य सरकारला सहकार्य केले.त्यामुळेच आज आपण सर्वजण या कठीण परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकलो.
येत्या काळात गुढीपाडवा,रमजान ईद, अक्षयतृतीया यांसारखे सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करता येणार असून ,महाराष्ट्रातील जनतेचा जनतेची लोकभावना लक्षात घेता घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडी सरकारचे समस्त पुणेकरांच्या वतीने मनपुर्वक धन्यवाद मानतो. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading