तृतीयपंथी वंचित घटकांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी शिबिर संपन्न

पुणे :  मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या मार्फत तसेच माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांचेमार्फत 31 मार्च जागतिक तृतीयपंथी दिवसाचे औचित्य साधून समाजातील तृतीयपंथी नागरीकांचा मतदार यादीत समावेश करणेसाठी विशेष शिबिर आयोजित करण्या बाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने 215-कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, पुणे या मतदारसंघात असणाऱ्या तृतीयपंथी वंचित घटकांचा मतदार यादीत समावेश करून घेणे हेतू, तसेच त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याकरिता बुधवार पेठ पुणे या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले.

सदर शिबीरामध्ये माननीय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार पुणे शहर राधिका हावळ – बारटक्के यांचेमार्फत शिबिरात उपस्थित झालेल्या सर्व तृतीयपंथीय नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जागतिक तृतीयपंथी दिनाच्या त्यांना फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची माहिती, मतदार नाव दुरुस्ती, मतदान यादी व इतर अनुषंगिक गोष्टींबाबत सविस्तर माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन केले व मतदार नाव नोंदणी करणे करीता आवाहन करण्यात आले.

याबाबत गोल्डन हार्ट संस्थेचा च्या समाजसेविका पण्णा दीदी यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले. त्यावेळी सदर शिबिराचे ठिकाणी 215-कसबा पेठ मतदार संघातील  प्रशांत कसबे, निवडणूक नायब तहसीलदार,  अजिंक्य वनशिव, महसूल सहाय्यक (निवडणूक) , पर्यवेक्षकीय अधिकारी  अजय भिसे,  योगेश चव्हाण,  सुनील माने,  दिनेश शिंदे, हनुमंत ढाळे, वैभव जंगम व सदर यादीभागाचे (BLO) केंद्रस्तरीय अधिकारी अभिजीत जाधव उपस्थित होते. तसेच स्थानीय तृतीय पंथीय समाजसेविका पन्ना दीदी, मल्लिका दीदी, अलका फाउंडेशन तर्फे अलका गुजनाळ, अमित गुजनाळ, निलेश गुजनाळ तसेच श्री अमित मोहिते सुरेश कालेकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: