तुळशीबाग व्यापारी यांच्या वतीने कोरानाचे निर्बंध हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत आनंदाची गुढी उभारून.
पुणे : तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने तुळशीबाग गणपती मंदिरात आनंदाची गुढी उभारून राज्य सरकारच्या कोरोनाच्या निर्बंध हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले…..गेली दोन वर्षं कोरोनाच्या भीतीमुळे व्यापारी अस्वस्थ होते…अशा परिस्थितीत शासनाच्या या निर्णयामुळे त्यांचे मनोबल निश्चित वाढेल….हिंदु धर्माच्या सणांची सुरुवात चैत्र गुढीपाडव्या पासून होते.
सणासुदीला बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांना गर्दी होत असते..आता सर्व सण उत्साहाने साजरा होणार असल्याने बाजारपेठेत नक्कीच चैतन्य येईल….एप्रिल मे मुख्यतः लग्नसराई असते .तसेच शाळांना पण सुट्ट्या असतात त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असते पण गेली दोन वर्षे निर्बंधांमुळे सण उत्साहात आणि नेहमीप्रमाणे साजरे केले नाही..पण आता शासनाने निर्बंध हटवल्यानंतर सर्व सण उत्साहाने साजरा होतील… आणि गेली दोन वर्षापासून डळमळीत झालेली अर्थव्यवस्था,जनजीवन पुर्वपदावर येईल.
श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडित उपाध्यक्ष रामदास तुळशीबागवाले, किरण चौहान, राजेंद्र साखरीया, राजू काळे,कन्हैय्या गंगवानी, मनिष पारेख,चंद्रकांत कोळी छोटे व्यावसायिक असोसिएशनचे अरविंद तांदळे उपस्थित होते. तसेच तुळशीबाग गणपती ची आरती करण्यात आली.