देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय पुण्यात उभारणार

मुंबई : वाचनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय राज्यात उभारण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे संग्रहालय पुणे शहरात उभारले जाणार आहे. यासाठी आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या(बालभारती) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी येत्या आर्थिक वर्षासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली आहे.

सध्या बालभारतीच्या ग्रंथालयात 1837 पासूनची पाठ्यपुस्तके जपून ठेवली आहेत. या पुस्तकांसह या संग्रहालयात अनेक प्राचीन आणि दुर्मिळ पाठ्यपुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याद्वारे पाठ्यपुस्तकांचा उद्देश, रचना, वैशिष्ट्य, स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अन्य राज्यातील पाठ्यपुस्तकेही एकत्र केली जाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: