Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राज्यातील कोरोना निर्बंध हटले मात्र पुण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली 

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 42 कोरोना रुग्णांची नोंद

पुणे : आज राज्य सरकारने सर्व कोरोना निर्बंध उठवले आहेत. मात्र गेल्या आठवड्याभरापासून 20 च्या आत असलेली पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या आज दुपटीने वाढली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 42 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 912 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार  444 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. तर आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 119 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 3 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1841 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading