‘DASVI’ SCREENED AT AGRA CENTRAL JAIL : अभिषेक बच्चनने कैदयांसोबत पाहिला चित्रपट

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दसावी’ या चित्रपटाचे आग्रा येथील सेंट्रल जेलमध्ये special screening करण्यात आले. बहुतेक असं पहिल्यांदाच झालं असेल की एका मल्टी स्टारर बॉलीवूड चित्रपटांचे पहिले स्क्रीनिंग एका जेलमध्ये झाले आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये या स्क्रीनिंगची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे यावेळी ‘दसावी’ चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अभिषेक बच्चन, यामी गौतम, निम्रत कौर यांसह चित्रपटाची टीम उपस्थित होती. चित्रपट समीक्षक तरन आदर्श याने ट्वीट करीत ही माहिती दिली आहे.

या चित्रपटात गंगारामच्या भूमिकेत अभिषेक बच्चन खूपच छान दिसत आहे. तो चौधरी नावाच्या एका राजकारण्याची भूमिका साकारली आहे. तर निम्रत कौरने या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर यामी गौतम ही एका कणखर आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे आग्रा येथील सेंट्रल जेलमध्येच वर्षभरापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: