Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

केजरीवाल यांच्या घरावरील हल्या प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल कारा – आप

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आज तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सिक्युरिटी बॅरियर तोडले, मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्यावर रंग फासले. हे सर्व होत असताना दिल्ली पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले. जिथे इतर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपास लोकांना फिरकू देखील दिले जात नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर भाजपच्या गुंडांच्या एका मोठ्या समूहाला अशा पद्धतीने राडा घालू देणे हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि समस्त आम आम आदमी पक्ष – पुणे तर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणातील भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. 

आज याबद्दल आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बालगंधर्व चौक येथे शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले. केवळ दहा वर्षांमध्ये आम आदमी पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्याने भारतीय जनता पक्ष प्रचंड विचलित झाला आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभवाची काळजी वाटत असून केंद्र सरकारने एक कायदा आणून दिल्ली महानगरपालिकांच्या नियोजित निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे. भाजप गेली अनेक दशके काश्मीरी पंडितांचे राजकारण करत असून प्रत्यक्षात 13 वर्षे केंद्रात सत्ता असून देखील भाजपने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी हितासाठी काहीच केले नाही. त्यामुळे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पोस्टर लावून आपण काश्मिरी पंडितांसाठी काहीतरी करत असल्याचा आव भाजपा आणत आहे, ही बाब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील लोकांच्या नजरेसमोर आणली.

भाजपचा दुटप्पी चेहरा हा विद्रुपपणे लोकांच्या समोर आल्याने चिडून, घाबरून जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading