एखाद्या पदापेक्षा भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र येण गरजेच – रोहित पवार
पुणे : पवार साहेब मोठे नेते आहेत. सोनिया गांधी देखील त्यांच्याशी बोलत असतात. जर सविंधनाला भाजप कडून तडा जात असेल तर एखाद्या पदापेक्षा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. लोकशाही टिकली पाहिजे यासाठी एकत्र यावं. कुठल्या पक्षाला मागे तर कुठल्या पक्षाला पुढे जावं लागेल आणि ते पक्षाचे नेते ठरवतील. मला असं वाटतं की एखाद्या पदापेक्षा भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेच आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पार्थचा पहिला प्रचारक मी असेल
पार्थ पवार यांना उमेदवारी भेटण्या संदर्भात रोहित पवारांना फोन केला होता अशा चर्चा चार-पाच दिवसात रंगू लागल्या,. जर पार्थ ला उमेदवारी मिळाली राज्यसभा असो किंवा लोकसभा असो तिथे प्रचार करण्याची संधी मिळाली तर पाहिलं तिथे पोहचणारा मी असेल, असेही रोहित पवार म्हणाले.
निधी वाटपावरून महा विकास आघाडी सरकार व भाजप मध्ये वाद सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले,
निधी वाटप कसा होतो याचा अभ्यास करायची गरज आहे .विकास कामांचा निधी कसा दिला जातो याची अभ्यास करण्याची गरज आहे .फडणवीस यांनी जे भाष्य केलं ते technically चुकीचे होते. भाजप शिव सेना सत्तेत असताना शिव सेने मंत्र्यांना निधी मिळाला तो मोठ्या प्रमाणात नव्हता .तीन पक्षाचं सरकार असून नीट निधी सगळ्यांना गेला आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पेट्रोल, डिझेल मध्ये गेल्या अडीच महिने वाढ नव्हती त्याच कारण म्हणजे निवडणुका. निकाल लागल्यानंतर भाव वाढले. राज्याचे २८ हजार कोटी केंद्राकडे अडकले नसते तर राज्य सरकारने टॅक्स कमी करण्यासंदर्भात विचार केला असता. मग पेट्रोल डिझेल दरवाढ झालीच नसती अशी टीका मोदी सरकार वर रोहित पवार यांनी केली.
