खासदार रामराव वडकूते यांचे अल्पशा आजाराने निधन
परभणी : भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांचे आज रविवारी पहाटे नवी दिल्लीत एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षाचे होते.
खा. वडकूते हे चार दिवसांपूर्वीच काही कामानिमित्त लखनौला गेले होते.तेथून ते परवा रात्री नवी दिल्लीत परतले. दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामी असताना राञी दम लागू लागल्याने ते अस्वस्थ झाले. अन् काल शनिवारी सकाळी ते मित्रासह नवी दिल्लीतील एम्स या नामांकित रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वडकुते यांची प्रकृती स्थिर होती. परंतु काल रात्री उशिरा उपचार सुरू असताना प्रकृती बिघडली . तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु त्यांचे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे निधन झाले. काही वर्षांपूर्वीच खासदार वडकुते यांची बायपास झाली होती.
दरम्यान हिंगोलीत कुटुंबीयांना निधनाचे वृत्त कळाल्यानंतर मोठा धक्का बसला.तत्पूर्वीच त्यांचे बंधू दिलीपराव वडकुते व अन्य काही मित्र हे काल रात्री नऊ वाजता ते रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त कळल्यानंतर तातडीने दिल्लीत दाखल झाले होते.
