Friday, June 5, 2026
Latest NewsSports

चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत 12 संघांचा समावेश

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत 12 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा 28 मार्च ते 16 एप्रिल 2022 कालावधीत कटारिया हायस्कुल मैदानावर रंगणार आहे.
स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना ब संघ, पीवायसी हिंदू जिमखाना 19 वर्षांखालील संघ, 22 यार्ड्स, पुणे पोलीस, क्रिकेट नेक्स्ट अकादमी, थर्ड आय स्पोर्ट्स,  एनएसएफए(नाशिक), द गेम चेंजर्स, रिवोल्यूशन स्पोर्ट्स अरेना, क्रिकेट ब्लास्टर्स, क्रीक इलेव्हन अकादमी, मायटी इलेव्हन हे 12 संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र  ठरणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार  आहे.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्ठीरक्षक आणि मालिकावीर यांनादेखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अग्रवाल यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading