fbpx
Saturday, May 11, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 11 कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये  कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी त्यातील चढ उतार कायम आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 11 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाहीये.    

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 819 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार  358 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 112 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1957 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading