Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कायदा हातात घेतल्यास पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील -दिलीप वळसे-पाटील

पुणे : अनिल परब हे एका घोटाळ्यात आरोपी सापडले म्हणून भाजपचे नेते किरीट सोमय्या आज शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या बंगल्यावर हातोडा मारण्यासाठी प्रशासकीय फौज घेऊन गेले आहेत. त्यावर कोणालाही कुठली लढाई लढायची असेल तर कायदेशीर लढली पाहिजे, कुणीही कायदा हातात घेतला. तर त्या सबंधात पोलीस नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती करतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुण्यातील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस दर आठवड्याला नवीन पेन ड्राइव बॉम्ब टाकत आहेत. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, ही एक नवीन पद्धत काढली आहे. खोटे नाटे आरोप करायचे. केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा… आणि त्यामधून सरकारच्या बद्दलचे वातावरण बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा. एका बाजूला कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला छोट्या गोष्टी वरुन मोठे मोर्चे काढून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा. सरकारची प्रतिमा असल्या गोष्टींमुळे बिघडणार नाही. आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीने काम करत आहोत. भविष्यात ही करत राहणार, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यावर पाटील म्हणाले, घडत असलेल्या घटना चिंताजनक आहे, पोलिसाना अलर्ट राहायला सांगितले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading