fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

समाजकल्याण विभागाने विभागीय कार्यालयासाठी जागा दिली आणि लागलीच काढुनही घेतली

पुणे : महाज्योतीचे मुख्यालय पुण्यावरून नागपुरला गेले, आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध विद्यार्थी योजनांसाठी नागपुरला जाणे जमत नाही, योजनांची माहीती पोचत नाही. म्हणुन महाज्योतीच्या संचालक मंडळाने पुण्यासह सर्व महसुली विभागात महाज्योतीची विभागीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुण्यात विभागीय कार्यालयांसाठी जागा मिळून देखील प्रादेशिक उपायूक्त यांनी शासकीय जागा देण्यास नकार दिला आहे.

 महाज्योतीच्या संचालक मंडळाने शासन नियमाप्रमाणे महाज्योतीच्या विभागीय कार्यालयांसाठी  नागपुर औरंगाबाद व नाशिक येथे सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागामधे जागा मागीतली व ती मिळाली सुध्दा. तशीच पुण्यामधे सुध्दा महाज्योतीला विभागीय कार्यालयासाठी जागा मिळावी, म्हणुन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सहा.आयुक्त समाजकल्याण पुणे यांचेकडे विनंतीपत्र दिले.त्यावर सहाय्यक उपायुक्त श्रीमती डवखरे यांनी २ मार्च २०२२ ला लेखी पत्र देवुन, पुणे येथील विश्रांतीवाडी सामाजिक न्याय भवनातील बी ईमारतीमधील पहिल्या माळ्यावरील रिकामा असलेला हाॅल महाज्योतीच्या कार्यालयिसाठी लेखी पत्र देवुन दिला. त्याच दिवशी महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी पत्र देवुन ताबाही घेतला. परंतु महाज्योतीने तिथे कार्यालयासाठी काम सुरू करणार, एवढ्यातच पुण्याचे प्रादेशिक उपायूक्त यांनी त्यावर आक्षेप घेवुन, शासनाची परवानगी असल्याशिवाय महाज्योतीला रिकामा पडलेला हाॅल देता येणार नाही, असे सांगीतले.

स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदिप आंबेकर यांनी सांगितले की प्रादेशिक उपायूक्तांणी जागा देण्यास नकार दिल्या नंतर पुण्याच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी महाज्योतीला पत्र देवुन, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची परवानगी आणल्याशिवाय रिकाम्या हाॅलचा ताबा देणार नाही, असे लेखी पत्र दिले. ही परवानगी महाज्योतीने परस्पर पाठपुरावा करूनच आणावी,असेही पत्रात सुचविले. महाज्योतीचे संचालक यांनी मुंबईला जावून, प्रत्यक्ष सामाजिक न्याय मंत्री यांची भेट घेवुन त्यांना पुण्याच्या सामाजिक भवनात जो हाॅल मिळालेला आहे,त्याला मान्यता द्यावी, अशी विनंती केली. त्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाला सुचनाही दिल्यात. पण त्यावर पुणे येथील समाजकल्याण आयुक्तांनी कुठलीही कारवाई केलेली नाही?

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading