fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

स्वारगेट – कात्रज मेट्रो अंडरग्राऊंड धावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे  मेट्रोचे उद्घाटन  केले. पण अजून काही भागातील  मेट्रो ही सुरू झाली नाही. त्यावर अजित पवार म्हणाले ,पंतप्रधानांच्या साक्षीने बोललो की अंडरग्राऊंज का ओव्हरहेड मध्ये चार वर्ष घालवले. पुण्यातील मेट्रो लवकर सुरु होईल यासाठी प्रयत्न करायला पंतप्रधानांना सांगितलं आहे. तसेच स्वारगेट – कात्रज मेट्रो अंडरग्राऊंड धावणार असल्याची माहिती  पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील ३२ किमी मेट्रो पैकी काही स्टेशन सुरु झाले आहेत. मेतरोचया वेग सध्या कमी आहे, त्यामुळे तांत्रिक बाजू सक्षम होण्यासाठी पूर्ण मार्गावर मेट्रो धावणे गरजेचे आहे. तसेच  पुणेकरांना आणि .मेट्रोलाही धावण्याचा, प्रवासाचा खर्च परवडलं पाहीजे. 

दरम्यान, शहरात मेट्रोची व्यावसायिक सेवा सुरू झाल्याने महामेट्रोच्या स्थानके तसेच कार्यालयांना आणि इतर अस्थापनांना महापालिकेकडून मिळकतकर आकारण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाची माहिती महापालिकेला सादर करावी. असे पत्र पालिकेकडून महामेट्रोला देण्यात आले आहे.त्याला व्यावसायिकदराने कर आकारणी केली जाणार आहे. असेही पवार यांनी सांगितले. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading