शिवसेना आमदार संतोष बांगरला महाराष्ट्रात फिरू देणार नाही – राजेंद्र पातोडे

शिवसेना आमदार संतोष बांगर आऊट ऑफ रेंज

अकोला – ‘वंचित’वर बालिश आरोप करणारा शिवसेनेचा पाचवी शिकलेल्या अडाणी अल्पशिक्षित आमदार संतोष बांगर ह्याला प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करून त्याला अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून देऊन त्याला साक्षर करण्याचा निर्धार युवा आघाडीने केला असून बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिला असून शिवसेना आमदार संतोष बांगर महाराष्ट्रात कसा फिरतो बघूच असा गर्भित इशारा वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर ह्या आमदाराने अकलेचे तारे तोडताना १००० कोटीचा हास्यास्पद व बालीश आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला होता.

वंचित बहूजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी बांगरला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्याला एक हजारावरील शुन्य वाचण्याची अक्कल आली पाहिजे.

आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे, ह्याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील.राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्याला घोडे लावण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले असून बांगरने केलेल्या आरोप त्याने सिद्ध करावे किंवा बिनशर्त माफी मागावी, अन्यथा बांगरला नांगर लावूच असा इशारा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

एकीकडे मविआमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे, त्याची धग आता मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकापर्यंत पोहोचली आहे. ह्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बांगर सारखे जुगारी आमदार बाश्फळ बडबड सुरू केल्याची टिका युवा आघाडीने केली आहे. यासर्व प्रकरणी आमदार आऊट ऑफ रेंज असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये.

राज्यात काही ठिकाणी आमदार बांगर वर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: