आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 22 कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण रोज कमी सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या खुप कमी आढळुन आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6लाख 61 हजार 779 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 52 हजार 316 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 0 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहे.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2236 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.