राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी बीडच्या हेमा पिंपळे

मुंबई : रुपाली चाकणकर यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याने त्यांनी पक्षातील पदावरून आज राजीनामा दिला आहे. त्यामुळे महिला राष्ट्रवादी अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार यावर जोरदार चर्चा चालू होती. मात्र आता हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदी वर्णी लागल्याने या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

बीडच्या हेमा पिंपळे यांनी काही दिवसापूर्वी हिजाबच्या विरोधात बीडमध्ये मोठे आंदोलन केले होते. कर्नाटकमध्ये हिजाबवरुन चाललेल्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी तसेच हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हिंदू महिलांनीही हिजाब परिधान करुन मुस्लिम महिलांना पाठिंबा दिला होता. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होता.

Leave a Reply

%d bloggers like this: