Pushpa the fire : ‘ऊ अंटावा’ गाण्याला समंथाने दिला होता नकार
Pushpa the fire या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्याचे बोल कानावर पडलेकी समंथाचा बोल्ड लूक, तिचा डान्स आणि त्यावरील तिच्या मादक अदा या लगेच डोळ्यासमोर येतात. समंथाचे हे पहिलेच आयटम सॉंग आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या गाण्याविषयी अधिक उत्सुकता होती. आज हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. मराठीसह अनेक भाषांमध्ये हे गाणे भाषांतरीत झाले आहे. मात्र जेव्हा सांमथाला या गाण्याची विचारणा झाली तेव्हा तिने या गाण्याला चक्क नकार दिला होता.
पुष्पाच्या चित्रीकरणाआधी अभिनेता अल्लू अर्जुनने समंथाला या गाण्याची ऑफर दिली होती. मात्र हे आयटम सॉंग असल्याने बराच वेळ घेतल्यानंतर तिने या गाण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतरही अल्लू अर्जुनने तिला या गाण्यासाठी समाजावून तयार केले. त्याच्यावर विश्वास ठेवत समंथाने ही ऑफर स्विकारली. या गाण्यासाठी तिने तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली होती. या गाण्याची कोरिओग्राफी बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केली आहे .
संबंधीत बातमी –
Pushpa the fire : ‘श्रीवल्ली’ नंतर ‘ओ आंटावा’चे मराठी व्हर्जन होतय तूफान लोकप्रिय https://maharashtralokmanch.com/2022/03/23/pushpa-the-fire-after-srivalli-the-marathi-version-of-o-antawa-is-becoming-popular/