fbpx

Pushpa the fire : ‘श्रीवल्ली’ नंतर ‘ऊ अंटावा’चे मराठी व्हर्जन होतय तूफान लोकप्रिय  

Pushpa the fire हा चित्रपटाने जवळपास सर्व सिने रसिकांना ‘साला झुकेगा नाही’ असं म्हणायला भाग पाडलं. या चित्रपटातील संवादाबरोबरच यातील गाणीही तूफान लोकप्रिय झाली आहेत.  तेलगू, तमिळ, मल्याळम, हिंदी नंतर आता ही गाणी मराठीतही आली आहेत. ‘श्रीवल्ली.. ‘या गाण्यांचे मराठी व्हर्जन यापूर्वीच आले आहे. आता ‘ऊ अंटावा’ या गाण्यांचे मराठी व्हर्जन सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘ऊ अंटावा’ हे गाणे टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन व अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. समंथाचे हे पहिलेच आयटम साँग असून यामधील समंथाचा बोल्ड लूक, तिचा डान्स आणि त्यावरील मादक अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले होते.

रागिनी कवठेकर यांनी हे मराठीतील गाणे गायले आहे. ‘ऊ बोलणार की ऊ ऊ बोलणार बाळा..’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला युट्यूबवर लाखांच्या घरात व्ह्यूज आहेत. डॉनी हजारिका यांनी या गाण्याचं म्युझिक मास्टरिंग केले आहे. तर शशांक कोंदविलकर यांनी या मराठी व्हर्जनचे बोल लिहिले आहेत. विशेष म्हणजे रागिनी कवठेकर यांनी ‘सामी..’ हे गाण्यांचे मल्याळम व्हर्जन देखील गायले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता ‘सामी..’ गाण्यांचे मराठी व्हर्जन बनवण्याची देखील मागणी युट्यूबवर केली जात आहे.

संबंधीत बातमी –

Pushpa the fire : ‘ऊ अंटावा’ गाण्याला समंथाने दिला होता नकार  https://maharashtralokmanch.com/2022/03/23/pushpa-the-fire-the-song-u-antawa-was-rejected-by-samantha/

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: