डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढिल सुनावणी 29 मार्चला
पुणे:अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये मुळे पुणे शहर हादरले होते गेली कित्येक वर्षे या प्रकरणामधील आरोपींची ओळख पटत नव्हती .या प्रकरणांमधील महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता निर्णयाक वळण मिळालं आहे.
पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण कांबळे २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही नेमबाज आरोपींना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. सचिन अंदूरे आणि शरद कळसकर अशी साक्षीदाराने ओळखलेल्या आरोपींची नावे आहे. पुणेविशेष न्यायालयासमोर दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. यावेळी सीबीआयचे अधिकारीही हजर होते. किरण कांबळे यांनी फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या हत्येप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे याला औरंगाबादमधून अटक केलेली.त्या बाबत आज पुढील सुनावणी आज झाली. सुनावणीचा चा वेळ संपत आल्यामुळे पुढील सुनावणी 29 मार्चला होणार असल्याचे नरेंद्र दाभोलकर प्रकरणातल्या वकिलांनी सांगितले.