Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पारंपारिक लोककलांच्या माध्यामातून शासकीय योजनांचा गावात जागर

पुणे : अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लोकगीत, पोवाडा, बतावणी, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यामातून जिल्ह्यातील गावात जागर करण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवून योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून १५ लोककला पथकाद्वारे जिल्ह्यातील गावांमध्ये १२ मार्च पासून जनजागृती मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

पद्मश्री कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई आवास (घरकुल) योजना, कन्यादान योजना, अत्याचाराला बळी पडलेल्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ, उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळणारे निर्वाह भत्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना, पुस्तक पेढी योजना, अनूसूचित जातीच्या सहकारी, औद्योगिक संस्थाना अर्थसह्याची योजना आदी योजनांची कलापथकांच्या माध्यमातून माहिती नागरिकांपर्यत पोहचविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील हवेली, मावळ, खेड (राजगुरुनगर), आंबेगाव, जुन्नर, बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर, वेल्हा, हवेली, शिरुर या तालुक्यात कलापथकाच्या माध्यामातून कार्यक्रम होते आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading