होळी, धूलिवंदनासाठी कोणतेही नवीन निर्बंध नाहीत; मात्र गर्दी टाळण्याचे आवाहन 

गृह विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : राज्यात होळी, धूलिवंदन व रंगपंचमी हे सण नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरे करतात. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचा उतरता आलेख पाहता यामध्ये राज्य सरकारच्या वतीने कोणतेही नवीन निर्बंध घालण्यात आले नाहीत. परंतु गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिक आनंदाने आपले सण साजरे करू शकतात.

आज (दि. १७) राज्यात सर्वत्र होळीची धामधूम सुरू आहे. तसेच दि. १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. यासाठी गृह विभागाने जारी केलेली नियमावली –

  • कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा.
  • या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
  • होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षीदेखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
  • तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक  नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.

 

Leave a Reply

%d bloggers like this: