मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांचे शास्त्रोक्त सादरीकरणाद्वारे निरसन
पुणे: मुळा- मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाबाबत असलेल्या आक्षेपांबाबत शहरातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी आज अधिकार्यांसमोर सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने या प्रकल्पामुळे नदी प्रवाहात निर्माण होणारे अडथळे पर्यावरणाची हानी पूरस्थिती आणि नदी पात्रात सोडले जाणारे सांडपाणी कसे रोखले जाणार .याबात विस्तृत सादरीकरण केले. या सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकाबाबत प्रकल्प अहवालामध्ये निश्चितच सर्व उपायोजना करण्यात आल्या असून. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेउन प्रशासन त्याअनुषंगाने सादरीकरण करणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
मुळा- मुठा नदी काठ आणि नदी सुधार योजनांच्या निविदा नुकत्याच मंजुर झाल्या. दरम्यान, या प्रकल्पांबाबत शहरातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी आक्षेप नोंदविल्याने मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्यासोबतच खासदार वंदना चव्हाण, दोन्ही महापालिकांचे आयुक्त व वरिष्ठ अधिकारी, पाटबंधारे व पर्यावरण विभागाचे सचिव आणि पर्यावरण प्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पांवरील आक्षेपांबाबत जाणून घेउन प्रकल्पाला गती देण्यासप्रकल्पांवरील आक्षेपांबाबत जाणून घेउन प्रकल्पाला गती देण्यासाठी एक समिती स्थापन करून पुण्यातच सविस्तर बैठक घेउन आक्षेप जाणून घेउन योग्य सूचनांचा प्रकल्पांत अंतर्भाव करून प्रकल्प पुढे नेण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचना दिल्या होत्या.
आज कौन्सिल हॉल येथे झालेल्या बैठकीमध्ये शहरातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या आक्षेपांबाबत व सूचनांबाबत सादरीकरण केले. या बैठकीला पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता एच.व्ही. गुनाले, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला , अधीक्षक अभियंता युवराज देशमुख सीडब्ल्यूपीआरएसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पंकज जोशी , डॉ. अन्नपुर्णा पटणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.डी. चोपडे राज्य प्रदूषण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रताप जगताप प्रकल्प अहवाल तयार करणारे गणेश अहिरे, दर्शना सोनी, रथीन गांधी, जलबिरादरी संस्थेचे नरेंद्र चूग, जिवीत नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, इकॉलॉजीकल सोसायटीचे गुरूदास नुल्का, सारंग यादवाडकर, प्रदीप पुरंदरे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे आदी याबैठकीला उपस्थित होते.