Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सारथी मुख्यालयाचे भूमिपूजन करून केलेल्या कर्मकांडाचा मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध


पुणे :आज सारथीच्या आवारात नवीन जागेत    झालेल्या भूमीपूजनाला मराठी क्रांती मोर्चा ने
इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून कर्मकांड केले आहे. असा आरोप करीत त्याचा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.
तसेच सारथी संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांविरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी स्थापन करण्यात आली. सेनापती बापट रस्त्यालगत या संस्थेच्या मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सारथी  संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या उपस्थितीत  भूमिपूजनासाठी धार्मिक पूजा करण्यात आली. या कृत्याचा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अनिल ताडगे, जितेंद्र कोंढरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading