fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

आयजीएल व कायनेटिक ग्रीनकडून धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा

पुणे : इंद्रप्रस्‍थ गॅस लिमिटेड (आयजीएल) ही भारताची सर्वात मोठी सीएनजी वितरण कंपनी आणि कायनेटिक ग्रीन या पुणे स्थित आघाडीची इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने भारतातील इलेक्ट्रिक वेईकल क्षेत्रामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा असलेल्‍या धोरणात्‍मक सहयोगांतर्गत डिझाइन केलेले पहिले बॅटरी स्‍वॅपिंग स्‍टेशन ‘एनर्जी कॅफे’चे अनावरण केले. या सहयोगांतर्गत आयजीएल व कायनेटिक बॅटरी स्‍वॅपिंग स्‍टेशन्‍सचे सखोल नेटवर्क सादर करेल, ज्‍याची सुरूवात दिल्‍लीसह झाली आहे, जेथे इलेक्ट्रिक तीनचाकी व इलेक्ट्रिक दुचाकीची श्रेणी बॅटरी स्‍वॅपिंग सुविधेचा लाभ घेऊ शकते.

बॅटरी स्‍वॅपिंगला एक संकल्‍पना म्‍हणून भारताच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सप्रती परिवर्तनामध्‍ये लोकप्रियता व गती मिळत आहे. नुकतेच अर्थसंकल्‍प भाषणादरम्‍यान आपल्‍या अर्थमंत्रींनी घोषणा केली की, लवकरच सरकारकडून सर्वसमावेशक बॅटरी स्‍वॅपिंग धोरण जाहीर करण्‍यात येईल.

या सहयोगांतर्गत विकसित करण्‍यात आलेल्‍या बॅटरी स्‍वॅपिंग स्‍टेशन्‍सना ‘एनर्जी कॅफे’ अशी हाक मारण्‍यात येईल. कॅफे, जेथे इंधन म्‍हणून एनर्जी किंवा बॅटरी पे पर युज सर्विसनुसार उपलब्‍ध असतील. एनर्जी कॅफेमध्‍ये आयजीएल व कायनेटिकने प्रगत तंत्रज्ञानाची संकल्‍पना मांडण्‍यासोबत अवलंब केला आहे. या कॅफेमध्‍ये सर्वसमावेशक आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्‍ज) आधारित यंत्रणा, स्‍मार्ट बॅटरीसह चार्जिंगसाठी प्रोटोकॉल आणि अनेक स्‍वॅपिंग कार्यसंचालनांचा समावेश आहे. यंत्रणा बॅटरी व स्‍टेशनवर देखरेख ठेवते, जे आयओटी सक्षम आहेत आणि अॅपशी जोडलेले आहेत. स्‍मार्ट नेटवर्क युजर्सना बॅटरी लोकेशन व चार्जिंग स्थितीचे रिअल-टाइम अभिप्राय देते.

या सहयोगाची आणखी एक खासियत म्‍हणजे हे सोल्‍यूशन फक्‍त कायनेटिक ग्रीनने बनवलेल्‍या ईव्‍हींसाठी नाही तर संपूर्ण ईव्‍ही क्षेत्रासाठी ओपन प्‍लॅटफॉर्म सोल्‍यूशन म्‍हणून संकल्पित करण्‍यात आले आहे. ते ब्रॅण्‍ड्स व वेईकल मॉडेल्‍समध्‍ये इंटर-ऑपरेबल असेल. या प्‍लॅटफॉर्ममध्‍ये सामील होण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ईव्‍हींमध्‍ये स्‍टेशन्‍समध्‍ये स्‍वॅप करता येणा-या विशेषरित्‍या उत्‍पादित या बॅट-या सुलभपणे बसवता येतात. आयजीएल पायाभूत सुविधा देण्‍याची भूमिका बजावेल. सुरूवातीला आयजीएलचे दिल्‍ली/एनसीआरमधील सीएनजी स्‍टेशन्‍सच्‍या विद्यमान व्‍यापक नेटवर्कमध्‍ये एनर्जी कॅफे इन्‍स्‍टॉल करण्‍यात येतील. कायनेटिक ग्रीन तंत्रज्ञान भागीदाराची भूमिका बजावत ईव्‍ही क्षेत्राबाबत माहिती देईल आणि स्‍वॅपिंग स्‍टेशन्‍समध्‍ये ईव्‍ही ग्राहकांना येण्‍यास मदत करेल.

याप्रसंगी बोलताना आयजीएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक ए. के. जाना म्‍हणाले, ”भारतातील आघाडीचे क्‍लीन एनर्जी सोल्‍यूशन प्रदाता बनण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत आम्‍हाला कायनेटिक ग्रीनसोबत सहयोगाने बॅटरी स्‍वॅपिंग सुविधा स्‍थापित करत ईमोबिलिटी विभागामध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या माध्‍यमातून सीएजीनंतरच्‍या आणखी एका हरित क्रांतीचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. आज आम्‍ही अनावरण केलेले बॅटरी स्‍वॅपिंग सोल्‍यूशन मोठ्या प्रमाणात ई-मोबिलिटी अवलंबतेला चालना देईल.”

आयजीएलचे व्‍यावसायिक संचालक पवन कुमार म्‍हणाले, ”क्‍लीन एनर्जी सोल्‍यूशन्‍स देण्‍याचे आमचे वैविध्‍यपूर्ण धोरण व आमच्‍या मिशनचा भाग म्‍हणून आम्‍ही ईव्‍ही चार्जिंग पायाभूत सुविधा स्‍थापित करत इलेक्ट्रिक वेईकल मूल्‍यसाखळीमध्‍ये प्रवेश करत आहोत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सुरक्षित व विश्‍वसनीय क्‍लीन एनर्जी सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading