सरकारला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचाय जरा जपून रहा – चंद्रकांत पाटील
पुणे :तुम्ही प्रसाद लाडला अडकवण्याचा प्रयत्न केला,प्रवीण दरेकर यांनी कोर्टाने रिलीफ दिला .ते कच्च्या गुरूचे चेले नाहीत. गिरीश महाजनांना तर मोक्का लावत होते . त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंग प्रकारचा गुन्हा सरकारने दाखल केला .त्यावर सरकार ला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचाय जरा जपून रहा. असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष वआमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल बदली अहवाल लिंक प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्याच पुण्याच्या कार्यक्रमात आले नाहीत. त्यावर देवेंद्रजी हे पोहोचलेले खेळाडू हे सोपं नाही. लोकशाही संपलेली नाही. आणि भाजप तर नाहीच नाही .राज्याच्या 12 कोटी जनतेने दोन दिवस चाललेला तमाशा बघितला असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले,आता झालं ते हिमनगाचे टोक अजून खूप काही बाकी .काय आहे ते आम्ही त्यांना विचारत नाही .असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी आता एका कार्यक्रमात पगडी घातली होती त्यावर पत्रकारांनी त्यांना तुम्ही पगडी घातली असा प्रश्न विचारला.त्या वर चंद्रकांत पाटील म्हणाले, फुले पगडी मला प्रिय मला फार छान वाटतंय म्हणून मी पगडी काढली नाही. पगडीवरून वाद करणारे मूर्ख शरद पवार असे बोलून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार टोला लगावला. महान नेत्यांच्या कतृत्वला सोडून पगडीवरून भांडत नसतात. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
