Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

स्थायी अघ्यक्षांचा ‘सत्ता हव्यास’ अवैध व अशोभनीय.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : पुणे मनपा ची मुदत १४ मार्च रोजी संपुष्टात येत असतांना.. व पुणे मनपा बरखास्त होऊन ‘पुणे मनपा’वर प्रशासक नेमला जात असतांना… पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष मा हेमंत रासने यांचा मनपा अधिनियम २०(३) प्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष वा समितीचे अस्तित्व कायम राहण्याचा दावा हा हास्यास्पद, अवैध व अशोभनीय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला…!

या टर्मची पहिली मुख्य-सभा १५मार्च २०१७ ला झाली मुळे, पुणे मनपा मुदत १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहे.. तसेच पुढील ‘मनपा निवडणुका तारीख वा कार्यक्रम’ निश्चित झालेला नाही… तशी धोषणा निवडणुक आयोगाने जाहीर केलेली नाही… अद्याप प्रभाग रचनेचा (आरक्षणा सह) ‘अंतिम मसुदा’ देखील जाहीर झाला नाही.. अशा परीस्थितीत निवडणुका निश्चित कधी होतील(?) हे देखील अधोरेखीत नसले मुळे तुर्त तरी (अनिश्चित काळा करीता) ‘मुदत संपणाऱ्या महापालीकांवर’ सर्वत्रच प्रशासक नेमले जात आहेत..!
अशा परिस्थितीत मनपा अधिनियम २० चे (३) प्रमाणे कोणत्याही परिस्थितीत स्थायी समितीचे वा अध्यक्षांचे कायदेशीर अस्तित्व हे कोणत्याही निष्कर्षा नुसार रहात नाहीत, हे सुर्य प्रकाशा ईतके स्पष्ट आहे..

देशाच्या संविधानात पुर्वी ‘द्वीराज्य स्तरीय’ पध्दत (केंद्र व राज्य सरकार) अधोरेखीत होती.. स्व राजीव गांधी यांनी ७३ व ७४ व्या घटना दुरूसितीने ग्रामीण (जिप, पंचायत समित्या, नगर परीषदा) व शहरी नगर पालीका व महानगरपालीकांचा संविधानात अंतर्भाव केला.. त्यामुळेच संविधान आर्टीकल २४३ (यू) मुळे नगर पालीका व महानगरपालिकांची कार्यप्रणाली निश्चित झाली आहे.. त्यात ऊल्लेख केल्या प्रमाणेच् पाच वर्षांचा कालावधी पुर्ण झालेवर मनपा व सदस्यांचे सभासदत्व हेच संपुष्टात येते व पर्यायाने मनपा संपुष्टात येते – बरखास्त होते..!

तरी हेमंत रासने यांनी व्यर्थ कायदेशीर संघर्ष करून आपला व प्रशासनाचा वेळ वाया घालवू नये व प्रशासकीय कामात व्यर्थ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, तर तो वेळ किमान आता तरी, ‘नागरीकांच्या सेवे साठी खर्च करावा, असा सल्ला देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला.. तसेच आपला अनावश्यक हस्तक्षेप राहणार नसल्याने मनपा प्रशासन जास्त चांगल्या प्रकारे व कार्यक्षमतेने काम करू शकेल, असा देखील आम्हाला ही विश्वास वाटत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading