संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
पुणे:छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शौर्यपीठ तुळापूर ( छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ ) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, निरगूडी चे उपसरपंच सनी मगर, शंभुराज्याभिषेक सोहळा संस्थापक शेखर पाटील, सुरज शिंदे,तुळापूर चे माजी उपसरपंच शिवाजीराव शिवले,विद्यार्धी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे,वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम,प्रदीप बारी,प्रसाद देठे,व शंभुप्रेमी उपस्थित होते.