महाविकास आघाडी सरकार गेलं.तरच महाराष्ट्राचा विकास होईल डॉ. भागवत कराड यांची टीका

पुणे: काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चे निकाल लागले त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर पाचपैकी चार राज्यांत भाजप निवडून आलंय. पण, त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे आताच सांगता येत नाही. येत्या निवडणुकीत भाजपच निवडून येणार आहे. हे महाविकास आघाडी सरकार गेलं.तरच महाराष्ट्राचा विकास होईल. त्यावेळी कुठलं सरकार आणायचं हे जनता ठरवेल असे केंद्रीय  अर्थराज्यमंत्री भागवत कराड  पुण्यात चेंबर ऑफ कॉमर्स उदयोगपतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते  पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर,राजेश पांडे संघटन सरचिटणीस. पुणे मनपा निवडणूक संचालन समिती प्रमुख उपस्थित होते.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावरून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी टीका केली आहे.
भागवत कराड म्हणाले,महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात पक्के आहे. घोषणा करून काहीही करत नाहीत. दिवाळी काळात केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. पण राज्य सरकारने काहीच केलं नाही. आता अर्थसंकल्पामध्ये देखील पेट्रोलमध्ये काही कर कमी केलेला दिसत नाही. मूलभूत सुविधा वाढावी अशी कुठलीच योजना महाराष्ट्र सरकारने आणली नाही. शेतकऱ्यांनी वीज कापणार नाही, असं कुठंच म्हणाले नाही.असं कराड म्हणाले.

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील, असे सांगितले जात आहे. यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. तसेच भाववाढ रोखण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक टीम काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकार ५ लाख उदयोगावर खर्च करणार आहे, अस भागवत कराड म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: