दिलासादायक : आज सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात कोरोना रुग्णाच्या एकही मृत्यूची नोंद नाही
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 125 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 65रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात कोरोना रुग्णाच्या एकही मृत्यूची नोंद नाही.
पुणे शहरात आजपर्यंत एकूण कोरोना रुग्ण संख्या ही 6 लाख 61 हजार 323 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 248 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 627अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 9 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2518 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
